महाराष्ट्र सरकार ने विधानसभेत अर्थसंकल (Maharashtra Budget 2023) मांडताना महिलांसाठी मोठी घोषणा केली, महिलांना एसटी प्रवासात ५०% सूट मिळणार आहे, पण या योजनेच्या काही अटी आणि शर्ती आहेत या पोस्ट मध्ये या योजने बद्दल सर्व माहिती देणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पीय भाषणात एक नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेमध्ये महिलांना आता एसटी मध्ये ५० टक्के सूट मिळणार आहे.
हा नवा प्रकल्प महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर घोषित केला गेला आहे. या अर्थसंकल्पात महिलावर्गाला विशेष लक्ष्य देण्यात आले आहे.
या योजनेत महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा व सुविधेचा वाढवा लक्षात ठेवून, महिलांसाठी नवीन बसाच्या श्रेणी बनवण्याचा प्रयत्न केला जाईल, आणि महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबवल्या जाईल.
हि योजना १७ मार्च पासून सूर करण्यात आली आहे, या योजने अतंर्गत सर्व महिलांना सर्व बसेस मध्ये तिकीट दरात ५०% सवलत मिळणार आहे, या मध्ये साध्य, ac, non ac, शिवशाही, शिवनेरी, आणि शिवाई या बसेस मध्ये सुद्धा महिलांना ५०% सवलत मिळणार.
हि योजना एसटी महामंडळात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस ना सुद्धा लागू होणार आहे, या बसेस मध्ये महिलांसाठी ५०% सवलतीच्या तिकीटाचे रंग संगती वेगळे असणार आहे.
प्रवासी भांड्यतील अपघात सहायता निधी आणि AC बसेस करीत वस्तू व सेवा कर रक्कम आकारण्यात येणार आहे.
म्हणजेच जर तुमचे १० रुपये तिकीट असेल तर, ५०% सवलतींमुळे ५ रुपये आणि वस्तू व सेवा कर २ रुपये, असे ७ रुपये तिकीट होईल.
या योजने मुळे तुम्ही राज्यात कुठेही फिरू शकता, पण तुम्हाला जर राज्याच्या बाहेर जायचे असेल तर महराष्ट्र राज्यच्या सीमेपर्यंत ५०% तिकीट घेतले जाईल आणि पुढे पूर्ण तिकीट घेतले जाईल.
हि योजना शहरी वाहतुकीसाठी लागू होणार नाही म्हणजेच ठाणे ते पनवेल, कल्याण ते पनवेल असा एसटी प्रवास करत असाल तर महिलाना तिकीट दरात ५०% सवलत मिळ्णार नाही.
आणि महिलांना रिजर्वेशन करताना सुद्धा या योजनेचा लाभ होणार नाही.
नोकरी, योजना संबंधित अपडेट्स साठी आत्ताच आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा.