सर्व आत्मकथन निबंध मराठी 9वी, 10वी, 12वी साठी नमुने आणि PDF | Atmakathan Nibandh In Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी उपयोजित लेखन मधील आत्मकथन निबंध मराठी बद्दल चर्चा करणार आहोत. आणि शिकणार आहोत की कसे atmakathan nibandh लिहायचे.

परीक्षेत खुप विषयावर निबंध विचारले जाते. निबंध लिहणे हे काय अवघड नाही. पण चांगला निबंध लिहणे हे अवघड आहे. चांगला निबंध लिहीत असताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. 

मी तुम्हाला या पोस्ट मध्ये सांगणार आहेच की आत्मकथन निबंध कसे लिहायचे?, सुरू कशी करायची?, सुंदर निबंध लिहण्यासाठी कोणत्या ट्रिकस आहेत. हे आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.

मित्रानो atmakathan nibandh in marathi या पोस्ट मध्ये मी तुम्हाला प्रत्येक atmakathan nibandha ची PDF फ्री मध्ये देणार आहे. तुम्ही या pdf ची प्रिंट काढून ठेऊ शकता.

आत्मकथन निबंध मराठी (Atmakathan Nibandh In Marathi)

मित्रांनो आपल्या परीक्षेत निबंध हमखास विचारला जातो. अन तुम्हाला आत्मकथन निबंध लिहता येत नसेल तर तूम्ही फुगट चे मार्क्स सोडत आहात. मित्रानो तुम्हाला फक्त त्या विषयाची थोडीतरी ते माहिती असावी लागते.

आत्मकथन निबंध म्हणजे काय?

आत्मकथन निबंध म्हणजे: सजीव व निर्जीव घटकांचे मनोगत व्यक्त करणे. त्या घटकाचे सुख दुःख, त्याचे जीवन अनुभव, कार्ये हे सगळे म्हणजे आत्मकथन निबंध. (ही व्याख्या मी स्वतः बनवली आहे. जेंव्हा मी निबंध लिहीत होतो)

आत्मकथन निबंध लेखनाच्या टिप्स

  1. सम्पूर्ण लेखन करताना भाशा ही प्रथम पुरुषी एकवचनी असावी. (उदा: मी, माझे, मला)
  2. कल्पना शक्तीच्या माध्यमाने नाट्यपूर्ण रीतीने कल्पना मडावी.
  3. आपण स्वतः ती वस्तू आहोत अशी कल्पना करून लेखन करावे.
  4. त्यांच्या भावना, सूख दुःख, सवयी, उपयोगीता, कार्य यांचा शोध निरक्षण शक्तीने घेणे.
  5. सजीव आणि निर्जीव घटकांबाबत सर्व समावेषक विचार.

आत्मकथन निबंध मराठी नमुना

मी तुम्हाला खाली काही नमुने दिले आहेत. त्या पैकी अनके आत्मकथन निबंध हे तुम्हाला परीक्षेत नक्की येणार याची मला खात्री आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत (आत्मकथन) 

मी वामन सिंदे कैलास नगर तालुका लातूर येथील रहिवासी आहे. माझा व्यवसाय शेती आहे. पण हा माझा व्यवसाय माझ्यासाठी जीवघेणा ठरलाय थोडी माझी कैफियत एकाला का? माझ्यासाठी थोडा वेळ दयाल का?

माझा परिवार हा जगाचा पोशिंदा आहे. देशाचा कणा आहे भारत देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. पण या शेतीची मशागत करण्याचा शेतकऱ्याकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. आज पाऊस वेळेवर होत नाही त्यामुळे शेतात बी पेरलेले बी हे उगवत नाही सर्वत्र दुष्काळ पसरलेला आहे.

कर्ज हप्ता वसुली हे सर्व कर्ज कसे फेडायचे. विहीर, तळे कोरडे आहे आम्ही दिवस कसे जगायचे पावसाचा एक ही थेंब नाही दुष्काळामुळे घरामध्ये बिकट अवस्था निर्माण झाली आहे. जगायचे कसे हा प्रश्न सतत भेडसावत आहे. घरातील मुलांचे बायकांचे हाल होत आहेत. 

शेती हा आमचा व्यवसाय असल्यामुळे आमच्याजवळ अन्य कोणताही मार्ग नाही. दुष्काळ परिस्थिती उदभवलेल्यामुळे मुलींचे लग्न करायचे राहिले आहे. संसाराचा गाडा हकायचा आहे. असे अनेक प्रश्न माझ्या समोर उभे राहिले आहेत.

या प्रश्नांच्या विळख्यातून मी कसा बाहेर पडणार याचे मला ज्ञान होत नाही. पैसे नसल्यामुळे कोणत्याही गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज असते. हे पैसे सावकाराकडून घेतो पण सावकार लोकही शेत गहाण ठेवल्याशिवाय पैसे देत नाही.

वर्षोनुवर्षे अशी परिस्थिती उदभवते. सावकार शेतीवर कबजा टाकतो. अशा वेळेस मनामध्ये आत्महत्या करण्याचा विचार येतो.पण मुलंबाळांकडे बघून असे पाऊल उचलण्याचे धाडस होत नाही. 

मला कोणी मदत करू शकाल का? शासनाच्या शेती संबंधी असलेल्या योजनांची माहिती दयाल का? शासन आम्हाला मदत करेल का?

मित्रानो ! आमची काळजी घ्या दुष्काळाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला मदत करू शकाल का? शासकीय योजनेचा लाभ आम्हाला पुरवा. शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करा. आधुनिक शेतीबद्दल माहिती करून द्या पाऊस चांगला झाला तर शेती मधून चांगले उत्पन्न काढेन याची हमी मी तुम्हाला देतो.

नैसर्गिक खत व पाण्याची सोय करून दिल्यास शेतीत भरपूर पिके घेता येणार आहेत मी आशावादी आहे या सुविधा मला उपलब्ध करून दयाल. तुम्हा सर्वाना विनंती करतो माझ्या गोष्टीवर लक्ष द्या आणि सहकार्य करा. धन्यवाद.

सर्व आत्मकथन निबंध मराठी (Atmakathan Nibandh In Marathi) 9वी, 10वी, 12वी साठी नमुने आणि PDF

आत्मकथन निबंध म्हणजे काय?

आत्मकथन निबंध म्हणजे: सजीव व निर्जीव घटकांचे मनोगत व्यक्त करणे. त्या घटकाचे सुख दुःख, त्याचे जीवन अनुभव, कार्ये हे सगळे म्हणजे आत्मकथन निबंध. (ही व्याख्या मी स्वतः बनवली आहे. जेंव्हा मी निबंध लिहीत होतो)

निष्कर्ष

मित्रानो मी तुम्हाला या पोस्ट मध्ये आत्मकथन निबंध मराठी मध्ये कसे लिहायचे? आणि आत्मकथन निबंध म्हणजे काय? आत्मकथन निबंध नमुना सुद्धा या पोस्ट मध्ये दिला आहे.

आणि तुम्हाला या पोस्ट मध्ये अन्य आत्मकथन निबंध मराठी चे लिंक दिले आहेत त्या लिंक वर क्लीक करून तो निबंध वाचू शकता. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर मित्रमंडळी सोबत नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र.

[table id=1 /]

Leave a Comment