कथा लेखन मराठी 8वी, 9वी, 10वी | Story Writing In Marathi 9th, 10th, 12th Class & PDF

नमस्कार आज आपण मराठी उपयोजित लेखन मधील एक घटक katha lekhan marathi कसे करायचे? हे या पोस्ट मध्ये पाहणार आहोत. या पोस्ट मध्ये तुम्हाला मराठी कथा लेखन बद्दल ची महत्त्वाची माहिती या पोस्ट मध्ये मिळणार आहे. तर पोस्ट ला पूर्ण वाचा.

या post मध्ये तुम्हाला katha lekhan marathi pdf सुध्दा या पोस्ट मध्ये उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही ही pdf download करू शकता.

कथा लेखन करताना कोणकोणत्या बाबी लक्षात घेणे आवश्यक असते. कथालेखन मूल्यमापनाच्या नियोजित कृती कोणत्या हे या पोस्ट मध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर सुरू करूया.

कथा लेखन मराठी (Story Writing In Marathi)

आपल्याला गोष्टी वाचण्यास आणि आयकण्यास खूप आवडते. पण जेव्हा वेळ येते गोष्ट लिहण्याची तर आपल्या समोर अनेक प्रशन उभे राहतात त्यातील मोठा प्रशन म्हणजे कसे लिहू?

तर मित्रानो कथा लेखन करणे अगदी सोपे आहे. कथा लेखन करताना तुम्ही कल्पना शक्तीचा वापर करू शकता. जसे आपण लहानपनी करत होतो.

मित्रांसोबत बोलताना मी मोठं झाल्यावर हे करणार मी ते करणार तेव्हा जसे आपण कल्पना करत होतो तसेच कथालेखन करताना करायचे आहे.

फक्त फरक एवढाच आहे की आपल्या एक विषय दिला जातो त्या विषयावर एक छान शी गोष्ट लिहायची आहे. आणि त्या कथेतून कोणता बोध मिळाला हे सांगायचे आहे.

तुम्ही एक छानशी कथा लिहली की मराठी मध्ये 6 गुण तर तुम्हाला सहज मिळतील.

मित्रानो तुम्हाला जाहिरात लेखन, बातमी लेखन, पत्र लेखन, आत्मकथन, वैचारिक लेखन आणि इतर उपयोजित लेखन मराठी मधील आणखी घटक येत नसतील तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून शिकू शकता. आणि pdf ही download करू शकता.

उत्तम Katha Lekhan करण्यासाठी साठी खालील बाबी लक्षात घेणे आवश्यक

  • कथेत प्रसंगानुसार वातावरण निर्मिती करावी.
  • काथाबिजाला अनुसरून कथेतील पात्र व त्यांचे संवाद पात्रानुसार योग्य भाषा असावी.
  • कथेला भाषेचा घटनांचा ओध कालानुक्रम असे आवश्यक आहे. 
  • कथेला योग्य शीर्षक दयावे.
  • शीर्षकावरून कथेच्या विषयाची कल्पना यायला हवी.
  • शीर्षक म्हणून सुविचार, म्हण असावेच असे काही बंधन नाही.
  • कथा भूतकाळात लिहावी.
  • लेखनातील घटना प्रसंगानुसार काळाचे योग्य भान राखले जाणे महत्वाचे आहे.

Marathi Katha Lekhan YouTube Video

Marathi Katha Lekhan मूल्यमापनाच्या नियोजित कृती

  • कथाबिजावरून कथालेखन
  • शीर्षकावरून कथालेखन 
  • दिलेल्या शब्दावरून कथालेखन
  • अपूर्ण कथा पूर्ण करणे

मुद्यावरून कथा लेखन

परीक्षेत वरी दिलेल्या विषयावर कथा लेखन करण्यास सांगितले जाते.

मी खाली अपूर्ण कथा लेखनाचा नमुना दिला आहे.

अपूर्ण कथा पूर्ण करा.

सहल

आमच्या शाळेची सहल निघाली होती बस ने प्रवास म्हणून सर्वच मुले आनंदात होती. गाणी गप्पागोष्टी रंगल्या होत्या पुढचा प्रवास जंगलातून होता. रात्रीचा प्रवास सर्वत्र काळोख रात्रीची शांतता सर्वच अंगावर शहारे आणणारे बसचा आवाज तेवढा रात्रीची शांतता भंग करत होता. अचानक बस थांबली सर्वानाच काय झाले? याची उतकंठा मी समोर पाहिले गाडीच्या प्रकाशात समोर अत्यंत ओमेद(मोठे) जनावर उभे होते. वाघाचे डोळे चमकत होते. आणि अचानक………….

पुर्ण कथा

असा प्रकार घडला की एका मागे एक असे अनेक वाघ आमच्या बस समोर येऊन थांबले आणि बसच्या अवतीभवती फिरु लागले. आम्हाला काही सुचेनासे झाले. आमचा जीव धोक्यात पडला होता. मी कधीही एवढे वाघ एकत्र पाहिले नव्हते बस मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते काही जण तर अक्षरशः रडू लागले होते कोणालाच काय करावे कळत नव्हतेतेवढ्यात आमच्या सरांनी बस मधील सर्व विद्यार्थ्यांना शांत बसण्यास सांगितले आणि बसच्या सर्व खिडक्या लावून घेण्यास सांगितले. ड्रायवर काकांनी कितीही वेळा हॉर्न वाजून वाघांना बसच्या समोरून हटवण्याचा प्रयत्न केला. पण वाघ समोरून सरकण्याचे नाव घेत न्हवते. आम्ही मात्र स्तब्ध होतो जणू आपल्यावर आता डोंगरच कोसळला आहे.

एवढ्यात माझी नजर खिडकीतून शेजारी असलेल्या जंगलात गेली. जंगलात वृक्ष तोड झाली होती तेव्हा माझ्या लक्षात आले की, माणसाने वाघांची वस्ती, निवारा एकप्रकारे नष्ट केलेली होती. वाघांचा निवारा नष्ट झाल्यामुळे ते रस्त्यावर येऊन आमच्या बस समोर येउन बसलेली होती. जणू ते आम्हाला प्रशन करत होते की आमच्या निवासाची जागा तुम्ही मानव नष्ट करत आहात. आता आम्ही कुठे राहायचे? असा प्रश्न तर करत नसतील ना! असा विचार मनामध्ये येऊन गेला.

थोड्या वेळाने सर्व वाघ बाजूला झाले परंतु त्याने विचार करण्यास भाग पाडले होते. आपण आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याची घरे उध्वस्त करत आहे हे योग्य नाही. जेवढा हक्क आपला या पृथ्वी वर आहे तेवढाच हक्क इतरांचा देखील आहे हे आपण विसरायला नको.

तसे पण निसर्ग सुरक्षित ठेवायला पाहिजे वृक्ष तोड कमी करून वृक्षांची काळजी घेतली पाहिजे. झाडे आहेत तर पाऊस वेळेवर पडतो. म्हणून मानवाने निसर्ग संपवू नये निसर्ग जर आपण संपवलो तर याचे अनेक परिणाम मानवाला भविष्यात होणार आहेत.

Katha Lekhan PDF Download

Katha Lekhan PDF Download
Katha Lekhan PDF Download

Marathi Katha Lekhan PDF Download करण्यासाठी खाली दिलेल्या download button वर क्लीक करा.

कथा लेखन करताना कोणकोणत्या बाबी लक्षात घेणे आवश्यक असते?

कथेत प्रसंगानुसार वातावरण निर्मिती करावी. कथाबिजाला अनुसरून कथेतील पात्र व त्यांचे संवाद पात्रानुसार योग्य भाषा असावी.

Katha Lekhan PDF कशी Download करायची?

Marathi Katha Lekhan PDF Download करण्यासाठी खाली दिलेल्या download button वर क्लीक करा.

निष्कर्ष

मी तुम्हाला Marathi Katha Lekhan या पोस्ट मध्ये मराठी कथा लेखन बद्दल ची महत्त्वाची माहिती दिली आहे. आणि काही नमुने सुद्धा दिले आहेत.

प्रत्येक नमुन्याचे PDF सुध्दा आम्ही पोस्ट च्या शेवटी दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला या पोस्ट चा नक्की फायदा होईल. या पोस्ट ला मित्रमंडळी सोबत नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र.

[table id=1 /]

Leave a Comment