महाराष्ट्र शासनाने 7/12, 8अ, Bhu Naksha आणि इतर भूमि संबंधित सुविधांसाठी Online पोर्टल सुरू केले आहे. त्यामुळे आता तुम्ही घरबसल्या ऑनलाइन सातबारा बघणे व जमिनीषी संबंधित सुविधांचा लाभ ऑनलाईन घेऊ शकता.
या आर्टिकल मध्ये सातबारा उतारा म्हणजे काय ?, ऑनलाइन सातबारा बघणे आणि ऑनलाईन 7/12 कसा शोधायचा हे सांगणार आहोत.
या आर्टिकल मध्ये अगदी सोप्या पद्धतीने 7/12 कसा शोधतात हे समजवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला आशा आहे की हे आर्टिकल लक्षपूर्वक वाचल्या नंतर तुम्हाला ऑनलाईन 7/12 बघणे व डाउनलोड करता येईल. तर चला मग 7/12 कसा शोधतात ते पाहूया.
Also Read: Barley In Marathi
7/12 कसा शोधायचा ? (7/12 Utara In Marathi Online)
7/12 कसा शोधायचा
तुम्हाला ऑनलाईन सातबारा बघणे व 7/12 शोधायचा असेल तर खाली दिलेल्या पायऱ्याचे पालन करा.
स्टेप 1: अधिकृत पोर्टल ला भेट द्या
7/12 ऑनलाईन बघण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र भूमि अभिलेख च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावि लागेल.
bhulekh.mahabhumi.gov.in हे महाराष्ट्र भूमिअभिलेख चे अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर 7/12 मिळते.
स्टेप 2: विभाग/जिल्हा निवडा
महाराष्ट्र राज्यात एकूण 6 विभाग आहे. त्यातून तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे. विभाग निवडल्या नंतर तुम्हाला तुम्ही निवडलेल्या विभागावर पुनर्निर्देशित करण्यात येईल.
तुम्हाला तुमचा विभाग माहीत नसेल तर खाली आम्ही विभाग आणि जिल्ह्याची यादी दिली आहे.
औरंगाबाद विभाग (Aurangabad Division) | औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली. |
नागपूर विभाग (Nagpur Division) | भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया , नागपूर, वर्धा. |
पुणे विभाग (Pune Division) | पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर. |
कोकण विभाग (Kokan Division) | मुंबई शहर, मुबंई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे. |
नाशिक विभाग (Nashik Division) | नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार. |
स्टेप 3 : तुमचा जिल्हा निवडा
आता तुम्हाला दोन पर्याय दिसतील 7/12 आणि 8अ त्यातून तुम्हाला जे हवे असेल ते निवडा.
नंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडा त्या नंतर तुम्ही 7/12 गट नंबर व 8अ सर्वे नंबर व नाव टाकून शोधू शकता.
आता शोधा या बटनावर क्लीक करा आता तुम्हाला तुमचा 7/12 ऑनलाईन दिसेल.
7/12 डाउनलोड करण्यासाठी खाली डाउनलोड pdf वर क्लिक करा.
Also read: समास मराठी व्याकरण
7/12 कसा शोधावे?
या आर्टिकल मध्ये सोप्या स्टेप्स मध्ये 7/12 कसा शोधाचा हे सांगितले आहे. हे आर्टिकल लक्षपूर्वक वाचून तुम्ही 7/12 शोधू शकता.
7/12 म्हणजे काय?
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९७१ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. ७/१२ उतारा महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात वापरले जाते. या दस्तऐवज मध्ये तुम्हाला जमिनीचा सर्वे नंबर, मालकाचे नाव, जमिनीचे क्षेत्रफळ हि सर्व माहिती मिळते.
निष्कर्ष
आम्हाला आशा आहे की तुम्हाला ऑनलाइन सातबारा बघणे आणि ऑनलाईन 7/12 कसा शोधायचा हे तुम्हाला समजले असेल. तुम्हाला ऑनलाईन 7/12 शोधताना अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कंमेन्ट करून सांगा आम्ही ते नक्कीच सोडवू.
[table id=1 /]